कविता
#टास्ककविता
तू कृष्ण मी राधा साथ तनामनाची
तुझ्यासवे सोबत संगत युगायुगांची
बासरीच्या सुरांकडे राधा धुंद होऊनी
अलगद धावे वृंदावनी जिथे कृष्णमुरारी
तनमनाचे भान हरपूनी सुरांत हरवूनी जाई
वृंदावनी व्याकुळली राधा आता मुकुंदा नाही
श्रीकृष्णाच्या नयनी पाणी हाती धरता पावा
तुझ्या-माझ्यातील अंतर राधे सोसतसे मुरली
तुझ्यासाठी वेणूचे सूर वृंदावनी स्थिरावले
मुरलीच्या स्वरांना अर्थ होता केवळ तुझ्यासवे
सोबतीला आहे मुरली तुझ्या स्मृती जागवण्या
राधाकृष्णाची जोडी होण्या जगतवंद्य
यज्ञकुंडात पडली आहुती राधे तुझ्या सहवासाची
माझ्या हृदयी वसली तेव्हा तुझीच केवळ मूर्ती
सोळा सहस्त्र नारी असुनी भवताली
पण राधा का कृष्णासवे उभी हे न जाणे कुणी
राधा कृष्ण पावा अन सूर जाणती याचे गमक
तनामधील अंतर कोसांचे परि मने झाली एक
तुझ्यामाझ्यातील अंतर सूक्ष्म एका रेषेचे
कोण कृष्ण अन कोण राधा अवघे एकची झाले
दुरावूनी ही कायमस्वरुपी एकमेकांचे झाले
कृष्णचरणी रुतता काटा मुखी नाम राधेचे
श्रीहरीच्या वेदनांना राधेनेच सहावे
कुठले अंतर कसला दुरावा मैलोनमैल अंतरावरही
राधा कृष्णाचीच अन कृष्णही फक्त राधेचाच
कृष्णही फक्त राधेचाच...सौ.हेमा पाटील.
दिनांक ७/४/२०२४
Comments
Post a Comment