अडखळ
अडखळ
©️ सौ.हेमा पाटील
आजही तिथेच आहे पाऊल माझे अडखळलेले..
वळून एकदा पाहशील तू, अशी आस आजही दाटते...
व्यवहार का नात्यात येतो, ना मला कधी कळले..
आठवाने तुझ्या आजही, हृदयी प्रीत झंकारते..
वाट वेगळी तुझी नी माझी, परि तुझ्या सयीने चालते..
दूर असूनी आजही मी, सभोवती तुलाच शोधते..
कृष्ण माझा मोरपीशी , त्यास त्याच रंगात न्याहाळते..
मनी ठसलेल्या तव प्रतिमेसंगे, मी आयुष्य ओढते..
अप्राप्य तू हे जाणते तरी, मन एका कटाक्षास आसुसले..
तृषार्त या नजरेत बघ, विरहाचे दुःख सामावले..
प्रकाशित करुनी वाटा जेव्हा,तुझी अबोल वेणू शांतवते..
हृदयातील आर्तता तेव्हा, मशाल होऊनी उजळते..मशाल होऊनी उजळते...इति हेमा उवाच
©️ सौ.हेमा पाटील.
दिनांक 7/5/2024
Comments
Post a Comment