परिवर्तन
नमस्कार..माझी लेखणी वर आज प्रसिद्ध झालेली माझी कथा वाचा..खालील लिंक वर क्लिक करून...
"सरिता..ऐ सरिता ! कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस"?
सरिताने भानावर येत स्वतःला सावरले, "अगं काही नाही गं असंच"...
"नाही.काहीतरी मेजर आहे..गेले चारपाच दिवस मी पहातेय तुझे काहीतरी बिनसलेय.मिलिंदमध्ये अन् तुझ्यात काही वाद झाला आहे का? मी बोलू का मिलिंदशी"?
"नाही गं..तसं काहीच नाही.जरा माझीच तब्येत बरी नाही".
"काय गुड न्यूज देतेयस की काय"...
यावर काहीच न बोलता सरिता कसनुसं हसली.दोघीही वेळ झाल्याने आपापले लेक्चर घेण्यासाठी आपापल्या क्लासरुमकडे गेल्या आणि तो विषय तेवढ्यावरच थांबला म्हणून सरिताला हायसे वाटले.
सरिता शहरातील एका नामांकित काॅलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती.
मिलिंदचे व तिचे ॲरेंज मॅरेज होते.सुशिक्षित अन् वेलसेटल्ड फॅमिली असल्याने व मिलिंद एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या हुद्यावर असल्याने सरिताच्या कुटुंबातील सर्वांनी या स्थळाला पसंती दर्शवली होती.
लग्नानंतर त्याच शहरात रहाणार असल्याने ती ही आनंदी होती. काही काळातच तिने मिलिंदच्या घरी गृहलक्ष्मीच्या रुपात गृहप्रवेश केला होता.
नवीन घरी आल्यावर सर्वांनी तिचे प्रेमाने स्वागत केले.सर्वांच्या आपुलकीमुळे तिला आपण सासरी आलो आहोत असे वाटलेच नाही. हसतखेळत, चेष्टामस्करीत एक वर्ष कसे निघून गेले सरिताला समजलेच नाही.
cakeav.com/2024/05/13/परिवर्तन/
©®सौ. हेमा पाटील
माझी लेखणी
कथा आवडल्यास माझी लेखणी पेज फॉलो करायला विसरू नका.
Comments
Post a Comment